॥ गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्‍गुरूते ॥

॥ या श्रेष्ठ गजानन गुरूते । तुम्ही आठवित रहा याते ॥

श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ, मिरज

श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळाची स्थापना सन १९८२ साली करण्यात आली. प्रथमपासूनच मंडळातर्फे दरवर्षी श्री महाराजांचा प्रकटदिन, पुण्यतिथी, गुढीपाडवा, गुरूपौर्णिमा, रामनवमी असे उत्सव केले जातात. तसेच संपूर्ण चातुर्मासात दशमी, एकादशी, द्वादशी या दिवशी “श्री गजानन विजय” या पोथीचे पारायण घरोघरी केले जाते. मंदिरामध्ये दर गुरूवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सामुदायिक आरती कार्यक्रम होत असून आरती नंतर महाप्रसादही चालू आहे. तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री तुकाराम गाथा पारायण वगैरे धार्मिक कार्यक्रम केले जातात.

मंडळाच्या या सातत्याने चाललेल्या कार्यक्रमांमुळे व भक्तांच्या सहकार्याने, मंडळाने दिंडीवेस, मिरज येथे श्री महाराजांचे मंदिर बांधणेसाठी २२.५ गुंठे इतकी जागा खरेदी केली आहे. श्री महाराजांचे मंदिर बांधण्यासाठी घेतलेली जागाही एका भक्ताने अल्पशा किंमतीत दिली असून ती मिरजेच्या वेशीवर १५०x१५० चौ. फूट म्हणजे चौरसाकृती आहे. मंदिर बांधल्यावर श्री महाराजांच्या मुर्तीचे तोंड उत्तर दिशेला म्हणजे भक्तांना दर्शन घेण्यास सोईस्कर होणारे व मंदिराची जागा स.नं. १९२ व १९३ अशा दोन सर्व्हे नंबरमध्ये आहे. म्हणजेच या सर्वच गोष्टी शेगांव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरासारखेच असल्याने शुभसंकेत दाखवतात.

प्रकटदिन उत्सव

उत्सवासाठी जमलेले भक्त दि. २२-०२-२०१४

मुर्ती प्रतिष्ठापना

मूर्तीची गुळाने केलेली पूजा दि. १८-५-२०१०

पालखी सोहळा

अश्वगजासह मूर्तीची मिरवणूक १९-०५-२०१०

कलशारोहण सोहळा

जग्दगुरू शंकराचार्य श्री. चंद्रशेखर महास्वामीजी, श्री सुभाष सव्व्वाशे यांना प्रसाद देताना

भक्त परिवार

चांदीच्या पादुका मिरवणूक श्री. दिनकर पन्हाळकर, श्री. प्रकाश गणपती नलवडे

विविध कार्यक्रम

ह. भ. प. श्री. सोपानकाका मुळे, मुंबई ०३-०२-२०१०
Back to Top